काश्मीरमध्ये ८ दहशतवादी ताब्यात


वेब टीम : जम्मू
उत्तर काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात लष्कराचे जवान आणि पोलिसांनी ‘लश्कर-ए-तोयबा’च्या आठ संशयित दहशतवाद्यांना पकडलं आहे.

त्यांची कसून चौकशी करण्यात येत आहे. भारतीय जवान आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई करत त्यांना ताब्यात घेतलं आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संशयित दहशतवादी हे बारामुल्लातील दुकानदारांना बाजारपेठ बंद करण्यासाठी धमकावत होते.

 तसेच परिसरात धमकी देणारे पोस्टर लावण्यामध्येही त्यांचा सहभाग होता. या दहशतवाद्यांकडे काही वस्तूही सापडल्या आहेत. त्यानंतर त्यांची कसून चौकशी केली जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post