कुटुंबातील वादामुळे पवारांच्या राजीनाम्याची शक्यता : गिरीश महाजन


वेब टीम : मुंबई
‘अजित पवारांच्या राजीनाम्यामागे सध्या त्यांच्या पक्षात सुरु असणारा तणाव हे कारण असू शकतं किंवा कुटुंबातील अंतर्गत कलह हे सुद्धा कारण असू शकतं.

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत आपल्याला पवारांच्या घरातील कौटुंबिक कलह पाहिला मिळाला.

शरद पवारांना नातू पार्थ पवारसाठी एक पाऊल मागे यावं लागलं होतं असं विधान राज्याचे जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केले आहे .

विधानसभेच्या निवडणुका तोंडावर असताना अजित पवारांनी राजीनामा दिल्यामुळे मला आश्चर्याचा धक्का बसला.

विशेष म्हणजे याची त्यांच्या घरच्यांना देखील माहिती नाही. अजित पवारांनी आमदारकीचा राजीनामा दिला असला तरी त्यांच्यावरील कारवाई थांबणार नाही , असेही महाजन म्हणाले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post