वेब टीम : अमरावती (आंध्रप्रदेश) ‘चलो आत्मकुरू’ रॅलीचे आयोजन करणारे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे पुत्र ल...
वेब टीम : अमरावती (आंध्रप्रदेश)
‘चलो आत्मकुरू’ रॅलीचे आयोजन करणारे आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि त्यांचे पुत्र लोकेश यांना आंध्र प्रदेश पोलिसांनी त्यांच्या राहत्या घरी नजरकैदेत ठेवले आहे.
नायडू यांनी पक्ष कार्यकर्ते आणि नेत्यांसोबत गुंटूर जिल्ह्यात सरकारच्या विरोधात चलो ‘आत्मकुरू’ रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीला सरकारने परवानगी नाकारण्याचा निर्णय घेतला.
त्यानंतर चंद्राबाबू यांनी सरकारच्या या निर्णयाच्या निषेधार्थ उपोषणाचे हत्यार उपसण्याची घोषणा करणाऱ्या चंद्राबाबूंना सरकारने नजरकैदेत ठेवण्याचा निर्णय घेतला.
चंद्राबाबू यांच्या तेलुगू देसम पार्टीने ‘चलो आत्मकुरू’ ही रॅली आज (बुधवार) गुंटूरमधील पलनाडू येथे आयोजित केली होती.
मात्र आंध्र प्रदेश पोलिसांनी या रॅलीला परवानगी नाकारत नरसरावपेटा, सत्तेनापल्ले, पलनाडू आणि गुराजलामध्ये कलम १४४ लागू करत जमावबंदी लागू केली.
पोलिसांनी राज्यातील बऱ्याच तेलुगू देसम पक्षाच्या नेत्यांनाही नजरकैदेत ठेवले आहे.
COMMENTS