दिल्लीचे फिरोजशहा कोटला स्टेडियम आता अरुण जेटली स्टेडियम


वेब टीम : दिल्ली
बीसीसीआयच्या वाढीसाठी माजी केंद्रीय अर्थमंत्री, दिवंगत अरुण जेटली यांचे मोठे योगदान राहिले आहे. त्यांच्या योगदानामुळेच बीसीसीआय आज इथपर्यंत पोहोचू शकली, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले.दिल्लीतली फिरोज शहा कोटला स्टेडियमचे नामकरण ‘अरुण जेटली स्टेडियम’ केले असून या स्टेडियमच्या एका पव्हेलियन स्टँडला टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीचे नाव दिले आहे. जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये आयोजित या नामकरण सोहळ्यावेळी शहा बोलत होते.

अरुण जेटली यांनी क्रीडा संघांना निधी मिळवून देण्यासाठी ते कायदेशीर लढाई लढायचे. बीसीसीआयसाठीही त्यांनी बरेच योगदान दिले. त्यामुळेच बीसीसीआयची इथपर्यंत वाटचाल झाली.बीसीसीआयला प्रभावी करण्यासाठी बीसीसीआयचे माजी अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी संघर्ष केला तर आयपीएल आल्यानंतरही टेस्ट, वनडे आणि टी-२०चा फॉर्मेट कायम ठेवण्यासाठी जेटलीने कार्य केले.ते बीसीसीआयला नेहमीच कायदेशीर सल्ला द्यायचे.आयपीएल यशस्वी करण्यासाठीही त्यांनी योगदान दिले होते,असे अमित शहा यांनी सांगितले.

कोणतीही अडचण असायची तेव्हा आम्ही जेटलींचा धावा करायचो. त्यांच्याकडे आमच्या प्रत्येक समस्येचे समाधान असायचे. रात्री उशिरा केव्हाही त्यांना फोन केला तरी ते फोन उचलायचे. त्यातून त्यांची खेळाप्रती ते समर्पित असल्याचे यातून दिसते,असे ही शहा म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post