बालाकोटचे टेरर कॅम्प पुन्हा सक्रिय : सेनाप्रमुख रावत


वेब टीम : दिल्ली
कमीत कमी ५०० दहशतवादी पीओकेमधून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करण्याच्या तयारीत असल्याची माहिती लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी आज चेन्नईत बोलताना दिली.

बालाकोट येथील ‘जैश ए मोहम्मद’च्या दहशतवाद्यांची ठिकाणे जी भारताने उद्ध्वस्त केली होती ती पाकिस्तानने पुन्हा सक्रिय केली आहे.

बालाकोटमध्ये असलेले हे दहशतवादी पुढेही जाऊ शकतात. इस्लामचा गैरवापर केला जात असून धर्मगुरूंनी इस्लामचा खरा अर्थ लोकांना सांगायला हवा, असेही रावत म्हणाले.

जम्मू- काश्मिरातील कलम ३७० रद्द करण्यात आल्यानंतर पाकिस्तानने आम्ही भारतात दहशतवादी पाठवू, असे उघडपणे म्हटले आहे.

यामुळेच पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करता यावी यासाठी पाकिस्तानकडून सतत शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जाते.

आम्ही बालाकोटपेक्षा अधिक पुढे जाऊ शकतो, असा थेट इशारा लष्करप्रमुखांनी पाकिस्तानला दिला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post