आमच्या काळात इडी काय प्रकार आहे ते कुणालाच माहीत नव्हतं : बाळासाहेब थोरात


वेब टीम : मुंबई
काँग्रेस पक्षवाढीसाठी सर्वच नेते कमी पडल्याची कबुली देत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले, आम्ही सत्तेत आलो, मंत्रालयात गेलो मात्र ‘टिळक भवन’ला विसरलो, या शब्दात त्यांनी नेत्यांचा समाचार घेतला.

मात्र राहुल गांधीं यांच्यानंतर सोनिा गांधींच्या रुपाने पक्षाला नवीन अध्यक्ष मिळाल्याचे समर्थनही त्यांनी केले. एका वृत्त वाहिनीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.

काँग्रेसमध्ये मुळीच मरगळ नसून, उलट जुने नेते गेल्यानं आता नवीन रक्ताला वाव मिळेल असे म्हणतानाच, यापूर्वीही काँग्रेस संपली असे म्हटले जात असताना इंदिरा गांधी मोठ्या बहुमतासह निवडून आल्या, याची आठवणही त्यांनी करून दिली.

 ईडी हा काय प्रकार आहे हे पाच वर्षांपूर्वी कुणाला माहितीही नव्हते. मात्र, आता सगळीकडे याची चर्चा आहे. सत्ताधाऱ्यांकडून त्याचा शस्त्रासारखा वापर होतो, असेही थोरात म्हणाले.

विखेंवरील प्रश्नाला उत्तर देताना, आपल्याला शेजारी निवडता येत नाही, अशी मिश्किल टिपण्णीही त्यांनी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post