काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे शिवबंधनात


वेब टीम : मुंबई
नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शनिवारी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी ‘मातोश्री’ निवासस्थानी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. 

यामुळे विधानसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. आमदार कांबळे यांना शिवसेनेत घेऊन त्यांनी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना मोठा धक्का दिला आहे. 

ना. राधाकृष्ण विखे पाटील पक्षातून गेल्यानंतर काँग्रेस ला गळती लागली आहे. ती थांबायला तयार नाही. प्रदेशाध्यक्ष थोरात आगामी काळात कोणती चाल खेळतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेस आणि राष्ट्रावादी काँग्रेसच्या नेते भाजप-शिवसेनेत दाखल होत आहेत. शनिवारी यात आणखी एका आमदाराची भर पडली. 

श्रीरामपूरचे काँग्रेसचे आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवसेनेचा भगवा हाती घेतला. यावेळी बोलताना माझ्या मनामध्ये काँग्रेसबद्दल राग नसल्याचे कांबळे यांनी स्पष्ट केले. 

आगामी विधानसभा निवडणुकीत संगमनेर मध्ये भाजपाने आणि राहाता येथे काँग्रेस ने अधिक लक्ष घातल्याने येथील निवडणुका लक्षवेधी ठरणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post