नगर विधानसभा मतदारसंघावर भाजपचा दावा


वेब टीम : अहमदनगर
विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. भारतीय जनता पार्टीच्या इच्छूक उमेदवारांच्या मुलाखती लवकरच होणार आहेत. या पार्श्‍वभूमीवर नगर शहर जिल्हाध्यक्ष माजी केंद्रीय मंत्री दिलीप गांधी यांनी शहरातील प्रमुख पदाधिकार्‍यांची महत्वपूर्ण बैठक लक्ष्मीकारंजा येथील कार्यालयात घेतली.

या बैठकीत नगर शहर विधानसभेची जागा भाजपलाच मिळविण्याचा महत्वपूर्ण ठराव दिलीप गांधी यांनी मांडला. त्यास महापौर बाबासाहेब वाकळे व उपमहापौर मालन ढोणे यांनी अनुमोदन दिले.

यावेळी सुनील रामदासी, सरचिटणीस किशोर बोरा, मध्यमंडल अध्यक्ष नरेंद्र कुलकर्णी, भिंगार मंडल अध्यक्ष शिवाजी दहिंडे, नगरसेवक भैय्या गंधे, रविंद्र बारस्कर, सुवेंद्र गांधी, चेतन जग्गी, अजय चितळे, उदय कराळे, संजय ढोणे, सतीश शिंदे, वसंत राठोड आदी प्रमुख पदाधिकार्‍यांसह कार्यकर्ते उपस्थित होते.

दिलीप गांधी म्हणाले, विधानसभेची निवडणुकीसाठी युतीबाबतचा निर्णय झालेला नाही. प्रदेश भाजपकडून नगरच्या जागेसाठी मुलाखत होणार आहे. नगरची जागा भारतीय जनता पार्टी पूर्ण ताकदीनिशी लढण्याच्या तयारीत असून, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, नगरसेवक कटीबद्ध आहेत. नगरची महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. तसेच महापालिका निवडणुकीत व लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या मतांचा टक्का मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नगरची जागा भाजपलाच मिळावी, असा ठराव प्रदेश कार्यालयाकडे पाठवत आहोत.

यावेळी कुसुम शेलार, सुषमा प्रभाकर, नंदा कुसळकर, प्रशांत मुथा, मिलिंद भालसिंग, मनेष साठे, अंबादास घडसिंग, संतोष शिरसाठ, महेश हेडा, पियुष संचेती, लक्ष्मीकांत तिवारी, नरेश चव्हाण, गणेश साठे, अॅड.चंदन बारटक्के, संजीव सातपुते, नाथा देवतरसे आदि उपस्थित होते. प्रास्तविक किशोर बोरा यांनी केले. आभार नरेंद्र कुलकर्णी यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post