नगर जिल्ह्यात भाजपच्या 'या' दोन आमदारांचे तिकीट कापणार


वेब टीम : अहमदनगर
विधानसभा निवडणुका आता काही दिवसांवर येऊन ठेपल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने जागावाटप संदर्भात हालचाली सुरु केल्या असून, भाजप या निवडणुकीत काही विद्यमान आमदारांची उमेदवारी कापण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्यात झालेल्या बैठकीत सुमारे 21 विद्यमान आमदारांना ‘नारळ’ देण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती समजली आहे.

 यात नगर जिल्ह्याच्या राहुरी मतदार संघातील विद्यमान आमदार शिवाजी कर्डीले व नेवासा मतदार संघातील बाळासाहेब मुरकुटे यांचे नाव अग्रणी असल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

दिल्ली येथे झालेल्या बैठकीत राष्ट्रीय संयंसेवक संघाने काही जागांवरील बदलाची सूचना केल्याची माहिती आहे.

तसेच, पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्यासोबत झालेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या बैठकीतही या निर्णयावर शिक्कामोर्तब झाला आहे.

 त्यामुळे भाजपच्या या विद्यमान आमदारांना पक्षादेश पळून दुसऱ्या पर्यायी उमेदवारासाठी सामान्य कार्यकर्त्यांप्रमाणे भाजपचे झेंडे हाती घ्यावे लागणार आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post