खुशखबर : चीनमधील २०० अमेरिकन कंपन्या भारतामध्ये येणार


वेब टीम : न्यूयॉर्क
चीन व अमेरिका यांच्यात सुरु असलेल्या व्यापार युद्धाचा भारताला फायदा होण्याची शक्यता आहे.

चीनमध्ये असलेल्या २०० अमेरिकन कंपन्यांनी भारतात येण्यासाठी इच्छा व्यक्त केल्याची माहिती यूएस इंडिया स्ट्रॅटजिक पार्टनरशिप फोरमचे अध्यक्ष मुकेश अघी यांनी दिली.

यूएस इंडिया स्ट्रॅटजिक पार्टनरशिप फोरम ही संस्था अमेरिका-चीनमधील व्यापार संबंधांना चालना देण्यासाठी प्रयत्न करते. या कंपनीकडे चीनमधील २०० अमेरिकन कंपन्यांनी भारतात येण्याची तयारी दाखविली आहे.

त्यामधून २१ अब्ज डॉलरची गुंतवणूक भारतात येऊ शकते, असे मुकेश अघी यांनी सांगितले. चीनमधून भारतामध्ये येण्याची कंपन्यांची तयारी पाहता तामिळनाडू त्यांच्यासाठी रेडकार्पेट अंथरेल, असा विश्वास अमेरिकेमधील भारताचे राजदूत संदीप चक्रवर्ती यांनी व्यक्त केला.

बौद्धिक संपदा हक्क कायदा आणि उद्योगानुकूलता या कारणांनी अमेरिकेबरोबर चीनचे व्यापार युद्ध सुरू आहे. चीनमधील अमेरिकन कंपन्यांनी इतरत्र स्थलांतरण केल्यास त्यांची डोनाल्ड ट्रम्प यांनी लादलेल्या आयात शुल्कामधून सुटका होऊ शकते.

 हे वाढीव शुल्क सप्टेंबरपासून लागू होणार आहे. अमेरिकन कंपन्यांना भारतामध्ये येण्यासाठी सरकार काय करू शकते, याची माहिती अघी यांनी यूएसआयएसपीएफचे सदस्य आणि अमेरिकेचे भारतामधील माजी राजदूत फ्रँक विस्नर यांना दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post