बारामतीत महाजनादेश यात्रेत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ


वेब टीम : पुणे
बारामतीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा पोहोचली असून यात्रेदरम्यान राष्ट्रवादी चे नेते शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर मुख्यमंत्र्यांनी हल्लाबोल केला. यामुळे संतप्त होत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या भाषणावेळी गोंधळ घातला.

यामुळे काही काळ एकच गोंधळ उडाला, पोलिसांना सौम्य लाठीमार करत गोंधळ घालणाऱ्यांना ताब्यात घेतले. यात्रा पुढे गेल्यानंतर त्यांना सोडून देण्यात आले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आज पवारांच्या बालेकिल्ल्यात धडकली. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार, अजित पवार यांच्यावर जोरदार टीकास्त्र सोडलं.

आघाडी सरकारच्या 15 वर्षांच्या काळात जेवढी कामं झाली, त्यापेक्षा अधिक कामं युती सरकारनं केल्याचा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.

तर पवारांनी चूक केल्यानंच आज राष्ट्रवादीला मोठी गळती लागल्याची टीका मुख्यमंत्र्यांनी केली. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भाषणादरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली.

 त्यावेळी पोलिसांनी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना तिथून बाजूला केलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी भाषण आटोपतं घेतलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post