मुख्यमंत्र्याच्या भेटीने पुण्यातील उमेदवारीचे गुढ वाढले


वेब टीम : पुणे
पुण्यातील गणपती भेटी दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वच प्रमुख इच्छुकांची आणि विद्यमान आमदारांची धाकधुक वाढवली आहे.

विद्यमान आमदारांच्या भेटी तर घेतल्याच मात्र उमेदवारी मागणार्‍या अन्य दावेदारांच्या मंडळांना भेटी देवून मुख्यमंत्र्याने उमेवारीचे गुढ आणखी वाढवले आहे.

मुख्यमंत्री मानाच्या गणपतीच्या दर्शनाचा दौरा ऐनवेळी ठरवण्यात आला. यावेळी त्यांनी शहरातील मानाच्या गणपतींचे दर्शन घेतलेच मात्र इच्छुकांच्या आणि आमदारांच्या भेटी सुध्दा घेतल्या.

मुख्यमंत्र्यांना भेटीसाठी विमानतळापासून ते मंडळांपर्यंत रांगच लागली होती. मुख्यमंत्र्याच्या ताफ्यात इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात होती. वडगावशेरी मतदारसंघातील इच्छुकांनी थेट विमानतळावरच मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्याच्या या काही तासांच्या दौर्‍यामध्ये आपण कसे मुख्यमंत्र्याच्य आसपास आणि समोर जावू असा प्रयत्न सर्वच इच्छुकांकडुण करण्यात आला.


पुण्यातील आठही मतदारसंघामध्ये भाजपकडे तब्बल 103 इच्छुकांची संख्या आहे. यामध्ये सर्वात जास्त 34 हे शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आहेत. खासदार गिरीष बापट यांच्यानंतर कसब्यातील जागा कोणाला मिळणार याच्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

त्यामुळे कसब्यातील उमेदवारीचे दावेदार असलेले हेमंत रासने आणि धीरज घाटे यांनी आपआपल्या मंडळामध्ये मुख्यमंत्र्याने घेवून त्यांना आपली दावेदारी असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित केले.

मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीला मुख्यमंत्र्यांनी भेट देवून त्यांना लोकमान्य टिळकांनी सुरु केलेल्या गणेशोत्सवामुळे सामाजिक अभिसरण झाले असून ही परंपरा आजही सुरु असल्याचे सांगितले. कसबा मतदारसंघामध्ये महापौर सौ. मुक्ता टिळक यांची प्रवळ दावेदारी मानली जात आहे.


कोथरुड मतदारसंघामधून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.मुरलीधर मोहळ यांच्या मंडळाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट निश्चित होती. त्यामुळे आमदार मेधा कुलकर्णी यांनी सूध्दा मुख्यमंत्र्याची भेट घेवून आपल्या कार्यअहवालाचे प्रकाशन केले.

त्यामुळे मुख्यमंत्र्यानी पुणे भेटीमध्ये इच्छुकांना आपले पत्ते उघडे केले नाही. पर्वती मतदारसंघामधून शहराध्यक्षा माधुरी मिसाळ या विद्यमान आमदार आहेत. त्या संपुर्ण दौर्‍यामध्ये मुख्यमंत्र्यासोबतच होत्या. यावेळी पर्वतीमधून इच्छुक असणारे सभागृहनेते श्रीनाथ भिमाले यांनी सुध्दा खिंड लढवत मुख्यमंत्र्यांची साथ सोडली नाही. आठही मतदारसंघाचे आमदार मुख्यमंत्र्यांबरोबर काल पहायला मिळाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post