वेब टीम : अहमदनगर खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करुन खंडणी मागणारे पो.नि.बाजीराव पोवार यांच्यावर कारवाई न झाल्यास पारनेर पोलिस ठा...
वेब टीम : अहमदनगर
खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न करुन खंडणी मागणारे पो.नि.बाजीराव पोवार यांच्यावर कारवाई न झाल्यास पारनेर पोलिस ठाण्यासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशारा बाळासाहेब माळी यांनी पत्रकार परिषदेत दिला.
माळी पुढे म्हणाले की, न्यायप्रविष्ठ असलेल्या दिवाणी बाबीत न्यायालयाचा कायम मनाई हुकूम असताना खोट्या गुन्ह्यात कारवाई करुन पत्नीसह मुलांना अटक करण्याची धमकी पो.नि.पोवार यांनी दिली. व अटक टाळण्याकरीता पाच लाखांची खंडणी मागितली.
याबाबत पोलिस अधिक्षक यांच्यासह मुख्यमंत्री व पंतप्रधान यांच्याकडे तक्रार करुनही पोवार यांची साधी चौकशीही झाली नाही. त्यामुळे येत्या 15 दिवसात पोवार यांच्यावर कारवाई झाली नाही तर पारनेर पोलिस ठाण्यासमोर आत्मदहन करील, असा इशारा माळी यांनी दिला.
COMMENTS