वेब टीम : मुंबई काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेश...
वेब टीम : मुंबई
काँग्रेसचे दिग्गज नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत हर्षवर्धन बुधवारी दुपारी ३ वाजता मुंबईत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत .
इंदापूर विधानसभेच्या जागावाटपावरून हर्षवर्धन पाटील नाराज होते. गेल्या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचे उमेदवार दत्तात्रय भारणे यांच्याकडून पाटील पराभव झाला होता.
त्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीतही जागा आपल्याला मिळावी असा आग्रह पाटील यांचा होता.
काही दिवसांपूर्वी इंदापूर येथे झालेल्या मेळाव्यात हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार व राष्ट्रवादीवर टीका केली होती.
मुख्यमंत्र्यांनी आपल्याला लोकसभेची ऑफर दिली आहे असे सांगत पाटील यांनी मेळाव्यातच भाजप प्रवेशाचे संकेत दिले होते.
COMMENTS