हर्षवर्धन पाटील भाजपात जाण्याच्या तयारीत


वेब टीम : इंदापूर
काँग्रेस-राष्ट्रवादीतून नेत्यांचे आउटगोइंग सुरु असतानाच आता हर्षवर्धन पाटीलही भाजपमध्ये जाण्याची शक्यता वाढली आहे. इंदापूरचे माजी आमदार व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी आज घेतलेल्या कार्यकर्ता मेळाव्यात भाजप व देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळली तर राष्ट्रवादीवर टीका केली.

 मुखमंत्र्यांनी आपल्याला लोकसभेची ऑफर दिल्याचेही हर्षवर्धन यांनी सांगितले.

या मेळाव्याच्या आधी राष्ट्रवादीतुन नुकतेच भाजपात गेलेल्या माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांनी हर्षवर्धन यांची भेट घेऊन बंद खोलीत त्यांच्याशी चर्चा केल्याने या शक्यतेला बळकटी मिळाली आहे.

बावडा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात पाटील यांनी राष्ट्रवादीवर चांगलेच तोंडसुख घेतले.

जोमाने लढू पण दगाबाजी सहन करणार नाही असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना पाठिंबा देण्याचे आव्हान केले. लवकरच भूमिका स्पष्ट करणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post