हरतालिका विसर्जन करताना दोन महिलांसह चौघे बुडाले


वेब टीम : वर्धा
हिंगणघाट येथे हरतालिका विसर्जन करताना तोल जाऊन दोन महिलांसह चारजण नदीत बुडाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

बुडालेल्यांपैकी एका महिलेचा मृत्यू झाला असून तीन जणांचा शोध सुरू आहे. याग ताणामुळे सणाच्या पहिल्याच दिवशी गालंगोट लागले.

ही दुर्घटना आज दुपारी हिंगणघाट येथे वणा नदीत घडली. हरतालका विसर्जन करताना दोन महिला आणि दोन लहानग्यांचा तोल गेल्याने हे चौघेही नदीत बुडाले.

त्यामुळे नदीवर आलेल्या इतर महिलांनी जोरजोरात ओरडण्यास सुरुवात केली.काही लोकांनी पोलिसांना तात्काळ घटनास्थळी बोलवल्यानंतर नदीत बुडालेल्या चौघांचा शोध घेण्यास सुरुवात केली.

यावेळी एका महिलेचा मृतदेह नदीतून काढण्यात पोलिसांना यश आले. मात्र आणखी एक महिला आणि दोन लहानग्यांचा अद्याप शोध लागलेला नाही.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post