कोल्हापुरात पुन्हा वाढला पावसाचा जोर ; नागरिकांचे स्थलांतर


वेब टीम : कोल्हापूर
पंचगंगा नदीने रविवारी इशारा पातळी गाठली .खबरदारीचा उपाय म्हणून स्थलांतर सुरु केले आहे.

शिरोळमधील चार गावातून ९७ तर करवीर मधील एका गावातून २५० कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आल्याचे सांगितले .

पावसाने गेला आठवडाभर पुन्हा जोर धरला आहे. रविवारी सकाळीच जोरदार पाऊस पडला. दुपारी पावसाची रिपरिप सुरु होती.

 दुपार नंतर ऊनपावसाचा खेळ सुरु झाला. पावसाने काहीशी उघडीप दिल्याने लोकांना दिलासा मिळाला. मात्र, जिल्हा प्रशासन सतर्क बनले. राधानगरी, कोयना, चांदोली धरणातील विसर्ग वाढला आहे.

कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत २४ तासात दोन फुटांनी वाढ झाली. सायंकाळी पंचगंगा ३९ फूट इशारा पातळीवरून वाहत होती.

राधानगरी धरणाचे ५ स्वयंचलित दरवाज्यामधून ८५४० तर अलमट्टीमधून १ लाख ८२ हजार पाण्याचा विसर्ग सुरु आहे. जिल्ह्यातील ६७ बंधारे पाण्याखाली गेले आहेत.

जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे पंचागंगा नदीची पातळी इशारा पातळीवरून वाहू लागल्याने कोल्हापूर जवळील चिखली गावातील ग्रामस्थ पुन्हा भयभीत झाले.

खबरदारी म्हणून जिल्हा प्रशासनाकडून चिखली,आंबेवाडी ग्रामस्थांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यामुळे जनावर आणि संसारउपयोगी साहित्य घेऊन येथील नागरिक तातडीने स्थलांतर करत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post