आमदार बाळासाहेब मुरकुटे यांचे गडाखांच्या सोनईत शक्तिप्रदर्शन; गर्दीचा उच्चांक


वेब टीम : अहमदनगर
“सोनईत गडाखांच्या बगलबच्यांनी
ग्रामपंचायतीची वाट लावली.विधानसभा निवडणुकीत संधी दिली तर सर्वप्रथम नगरपंचायत करुन सोनईचं सोनं करुन दाखवितो.” असे अश्वासन आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी विकासदिंडी सांगता सभेत
दिले.

आदर्श विद्यालयाच्या मैदानावर झालेल्या विकास दिंडी सांगता सभेचे अध्यक्षस्थानी शनैश्वर देवस्थानचे विश्वस्त बापुसाहेब शेटे होते.जेष्ठ कार्यकर्ते भाऊसाहेब पटारे, दत्तात्रेय लोहकरे, अंबादास कोरडे, डाॅ.वैभव शेटे,शनिशिंगणापुरचे सरपंच बाळासाहेब बानकर, कांगोणीचे सरपंच अप्पासाहेब शिंदे, शिवाजी दहातोंडे उपस्थित होते. प्रास्ताविक ज्ञानेश्वर पेचे यांनी केले. सभेत रशीद इनामदार, अकुंश काळे, प्रकाश शेटे यांचे भाषण झाले.

विकासदिंडीला गडाखांच्या सोनई परीसरात
क्रांतिकारीच्या युवकांनी गडाखांच्या सांगण्यावरुन जाणीवपूर्वक त्रास दिल्याचे सांगत, हीच ताकद विकास कामासाठी दाखवा असे सांगून जेष्ठ नेते गडाखांनी पुत्रप्रेमापोटी ध्रुतराष्टाप्रमाणे डोळ्यावर पट्टी बांधल्याची टिका मुरकुटे यांनी केली. शनिशिंगणापुरातून काढण्यात आलेली विकासदिंडीची मिरवणूक सोनईत आल्यानंतर स्वागत करण्यात आले.

सुजय विखेंनी मुरकुटे यांना टाळले
विकास दिंडीच्या समारोप कार्यक्रमासाठी खासदार सुजय विखे येणार असल्याचे मुरकुटे यांनी सांगितले होते. मात्र लोकसभेतील मदतीची जाणीव ठेवून विखे यांनी सोनई मध्ये येत गडाखांच्या विरोधात बोलणे टाळल्याची चर्चा यावेळी होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post