बीड जिल्ह्यास मुळा धरणाचे पाणी देण्यास विरोध


वेब टीम : अहमदनगर
मुळा धरणातील शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी वगळून काही शिल्लक राहत असेल तर बीडला नेण्यास हरकत नाही परंतु आमच्या शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा आणून, बीडला पाणी नेण्यास विरोध आहे,” असे प्रतिपादन भाजपचे माजी आमदार चंद्रशेखर कदम यांनी केले.

देवळाली प्रवरा येथे सोसायटीच्या वार्षिक सभेत कदम बोलत होते.नगराध्यक्ष सत्यजित कदम, सोसायटीचे अध्यक्ष सोपान भांड,उपाध्यक्ष दिगंबर पंडित, माजी नगराध्यक्ष जगन्नाथ चव्हाण, मुरलीधर कदम, गोरख मुसमाडे, भौमराज कदम,संदीप खुरुद, देवराम कडू, सोपान पठारे उपस्थित होते.


कदम म्हणाले, “बीडच्या नेत्या मंत्री पंकजा मुंडे  या आमच्याच पक्षाच्या भगिनी आहेत. त्यांना
पाणी नेण्यास माझा विरोध नाही.

त्यांनी माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हक्काच्या पाण्यावर गदा येणार नाही याची काळजी घ्यावी. पाणीवापर संस्था बरखास्त करण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे ती चुकीची आहे. यापूर्वी पाण्याची व्यवस्था कारखान्यातर्फे केली जायची.यंदा कारखाना सुरू होण्याची शाश्‍वती नाही.

शेतकऱ्यांनी पाणीमागणी अर्ज भरून हक्काचे पाणी अबाधित ठेवावे. भंडारदरा धरणातून राहूरीच्या वाट्याला 15 टक्‍के पाणी आहे. सध्या अवघे 2 टक्के पाणी मिळते.शेतकऱ्यांनी सावध व्हावे.देवळाली प्रवरा येथे ओढे-नाले खोलीकरण व हंदीकरणाची कामे सुरू आहेत.

जलसंधारणाच्या कामास नागरिकांनी सहकार्य करावे. सोसायटीच्या कामगारांना वेतनवाढ व महागाई भत्त्यात वाढ करण्याची घोषणा कदम यांनी केली.व्यवस्थापक बाबासाहेब वाळुंज यांनी अहवाल वाचन केले. शहाजी कदम यांनी आभार मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post