शरद पवारांच्या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या दोन गटात राडा


नगर : प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत अमदनगरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यकर्ता मेळावा दरम्यान राष्ट्रवादीच्या दोन गटांमध्ये राडा झाला. माजी महापौर अभिषेक कळमकर यांच्या अंगावर चप्पल भिरकावत त्यांना धक्काबुक्की करण्याचा प्रकार झाल्याने वातावरण तणावपूर्ण झाले होते.

याबाबत अभिषेक कळमकर हे कोतवाली पोलिस ठाण्यात दाखल झाले असून गुन्हा नोंदवण्यात येऊ शकतो. माजी महापौर अभिषेक कळमकर हे राष्ट्रवादीकडून अहमदनगर शहरामधून विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे विद्यमान आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थकांनी हा प्रकार केल्याचा आरोप कळमकर समर्थकांकडून करण्यात येत आहे.

मेळावा संपल्यानंतर अभिषेक कळमकर हे कार्यक्रम स्थळावरून बाहेर जात असताना हा प्रकार घडला. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष किरण काळे हेदेखील उपस्थित होते. त्यांनादेखील धक्काबुक्की झाल्याचे समजते. या घटनेनंतर नगर शहरात वातावरण तणावपूर्ण झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post