शेतकऱ्यांना कांदा रडविणार; निर्यातीला केंद्र सरकारची बंदी


वेब टीम : दिल्ली
 संपूर्ण देशभरातून वाढलेली कांद्याची मागणी, कमी झालेला पुरवठा आणि वाढलेले दर नियंत्रित करण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर बंदी घातली आहे.

उत्पादन कमी झाल्याने कांद्यांच्या किंमती गगनाला भिडल्या होत्या. देशभरातील बाजार पेठांमध्ये मागणीनुसार कांद्याचा पुरवठा होत नव्हता.

त्यातच गेल्या अनेक दिवसांपासून देशात कांद्याची आवकही कमी झाली आहे. नेहमी दक्षिण भारतातून येणारा कांदाही अद्याप बाजारपेठांमध्ये दाखल झालेला नाही.

महाराष्ट्रातील कांदाही उत्तर प्रदेश आणि परदेशात जाऊ लागला आहे. त्यामुळे कांद्याचे भाव नागरिकांच्या आवाक्याबाहेर जाऊन कांद्याची टंचाई निर्माण होऊ नये ह्यासाठी सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत.

केंद्राने घेतलेल्या निर्यात बंदीच्या निर्णयामुळे घेतल्याने निर्यातीसाठीचा कांदा भारतीय बाजारपेठांत वळवता येणार आहे.

कांदा मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार असल्याने कांद्याचे भावही घसरतील.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post