फलटण-लोणंद मार्गावर धावली पहिली डेमू


वेब टीम : पुणे
मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील फलटण-लोणंद या मार्गावर 26 किलोमीटर नवा रेल्वे मार्ग तयार करण्यात आला आहे. या मार्गावर पहिली डेमू फलटण रेल्वे स्थानकातून लोणंदकडे रवाना झाली.

या वेळी पालकमंत्री सदाभाऊ खोत, खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे, माजी खासदार विजयसिंह मोहिते पाटील आदी उपस्थित होते.

ही गाडी सकाळी 7.20 वाजता लोणंद रेल्वे स्थानकाहून रवाना होईल. ती 8.50 वाजता फलटण रेल्वे स्थानकात पोहोचेल. तीच गाडी सकाळी 9.30 वाजता फलटण रेल्वे स्थानकातून रवाना होईल. 11 वाजता लोणंद रेल्वे स्थानकात पोहोचेल.

तीच गाडी सकाळी 11.35 वाजता लोणंद रेल्वे स्थानकातून सुटेल. दुपारी 1.5 वाजता फलटण रेल्वे स्थानकात पोहोचेल. फलटण रेल्वे स्थानकातून दुपारी 1.45 वाजता गाडी निघेल आणि 3.15 वाजता लोणंद रेल्वे स्थानकावर पोहोचेल.

ही गाडी तारडगाव, सुरवडी रेल्वे स्थानकांसह मार्गातील सर्व रेल्वे स्थानकांवर थांबेल. फलटण ते लोणंद तिकीट दर 10 रुपये आहे. या गाडीचे तिकीट लोणंद रेल्वे स्थानकावर उपलब्ध आहे.

फलटण, तारडगाव आणि सुरवडी रेल्वे स्थानकांवरून चढणार्‍या प्रवाशांना गाडीतील गार्डकडून तिकीट घेता येणार आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post