राजस्तानमध्ये अपघातात तेरा जण ठार ; आठ जखमी


वेब टीम : जोधपूर
जोधपुरच्या बालेसरजवळ झालेल्या एका भीषण अपघातात तेरा जणांचा मृत्यू झाला. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता असून जवळपास आठ जण गंभीर जखमी झाले.

जखमींची प्रकृती गंभीर असल्याचे समजते.हा भीषण अपघात बालसेर पोलीस स्टेशन हद्दीत आज (शुक्रवार) दुपारी मिनी बस व जीपमध्ये झाला.या दुर्घटनेत घटनास्थळीच १३ जणांचा मृत्यू झाला.

या भीषण अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत, जखमींना तातडीने जोधपूर येथील रूग्णालयात हलवले.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हा अपघात अत्यंत भीषण होता.जैसलमरकडे जाणारी एक मिनी बस व समोर भरधाव येणाऱ्या जीपला धडकल्याने भीषण अपघात झाला.

अपघातानंतर चुराडा झालेल्या दोन्ही वाहनांमधील प्रवासी आतच अडकलेले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post