रोहितचे संघाबाहेर बसने हे वेदना देणारे : रहाणे


वेब टीम : मुंबई
दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या आगामी कसोटी मालिकेत मुंबईकर रोहित शर्मा सलामीवीर म्हणून खेळण्याची शक्यता आहे. रोहितच्या या नव्या भूमिकेबद्दल भारताचा दमदार फलंदाज अजिंक्य रहाणे आशावादी आहे.

एका कार्यक्रमात बोलताना त्याने रोहितला जर सलामीवीर म्हणून संधी मिळाली तर मला आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया दिली.

तो म्हणाला की, मी हे वेस्ट इंडिज दौऱ्यातही म्हटले होते. रोहितसारखा विशेष गुणवत्ता असलेला खेळाडू संघाबाहेर बसतो हे वेदनादायी असते.

या कार्यक्रमात अजिंक्य रहाणे, बुद्धिबळपटू द्रोणावली हरिका, स्नूकरपटू ध्वज हरिया यांच्याशी संवादाचे आयोजन केले होते.

त्यावेळी बोलताना रहाणे म्हणाला की, रोहितने खरोखरच खूप मेहनत घेतलेली आहे.त्यामुळे त्याला सलामीवीर म्हणून संधी मिळाली तर तो नक्कीच चांगली कामगिरी करून दाखवेल.

त्याच्यात असलेल्या गुणवत्तेची आपल्याला चांगलीच कल्पना आहे.कसोटी क्रिकेट हा मनोबलाचा खेळ आहे तर वनडे क्रिकेटमध्ये तुम्ही मैदानात उतरलात की, तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणे आवश्यक असते.

कसोटी क्रिकेटमध्ये गोलंदाज वरचढ होत असतील तर तुम्हाला त्यांचा आदर राखावा लागतो. नंतर तुम्ही तुमच्या पद्धतीने खेळ करू शकता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post