मनमोहन सिंग यांच्या सल्ला गांभीर्याने घ्या : उद्धव ठाकरे


वेब टीम : मुंबई
‘देशातील सध्याच्या आर्थिक मंदीबद्दल भक्त काहीही बोलत असले तरी सत्याचा कोंबडा आरवला आहे. अर्थव्यवस्थेला बूच लागला आहे. मनमोहन सिंह या शहाण्या माणसाने सौम्य शब्दांत हेच सांगितलंय.

मंदीचे राजकारण न करता त्यांचा सल्ला गांभीर्यानं घ्या. त्यातच राष्ट्राचं हित आहे,’ अशा परखड शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारला सुनावलं आहे.

देशात मंदीमुळे बऱ्याच कंपन्यांमध्ये नोकरकपात सुरू आहे. नोकरदारांमध्ये घबराट आहे. जीडीपी पाच टक्क्यांपर्यंत खाली घसरला आहे.

 या स्थितीवर भाष्य करताना मनमोहन सिंग यांनी भविष्यातील संकटाची जाणीव करून दिली.तज्ज्ञांच्या मदतीने देश सावरण्याचे आवाहन त्यांनी केले.

त्यांच्या वक्तव्याचा धागा पकडून उद्धव ठाकरे यांनी ‘सामना’च्या अग्रलेखातून सरकारला तिरकस शब्दांत युक्तीच्या गोष्टी सांगितल्या.त्याचवेळी, मनमोहन सिंग यांचे कौतुकही केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post