सेनापती गेले, आता आम्ही मावळे लढू : धनंजय मुंडे


वेब टीम : मुंबई
उदयनराजे यांनी भाजपत जाण्याचा निर्णय घेतला, याचे मला फार फार वाईट वाटले.उदयनराजेंची गुरुवारी शरद पवार यांच्यासोबत बैठक झाली.

त्या बैठकीत उदयनराजे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या जनतेच्या प्रश्नांबाबत अत्यंत निराश होते. भाजपविषयी ते जे काही बोलत होते. त्यानंतर ते भाजपत जातील असे वाटले नव्हते.

जीएसटी, मंदी, बेरोजगारी या सगळ्या विषयांवर चर्चा झाली. हे सरकार चांगले काम करत नसल्याचे ही त्यांनी म्हटले होते.मात्र संध्याकाळी काय घडलं ते माहित नाही.

उदयनराजे भोसले यांनी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. हा निर्णय त्यांनी का घेतला? ते माहित नाही. रयतेची काळजी असलेले राजे गेले, सेनापती गेले आता आम्ही मावळे लढू”, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली.

शिवसेनेत गेलेल्या भास्कर जाधव यांच्यावरही धनंजय मुंडे यांनी टीका केली. “भास्कर जाधव २०१३ मध्ये विचारत होते ठाकरेंचा व्यवसाय नाही मग त्यांचे उत्पन्न इतके कसे? आज भास्कर जाधव यांना उत्तर मिळाले असेल अशी अपेक्षा आहे.

तुम्हाला पवारसाहेबांनी पद दिले, सगळं दिले.लोकांचा विकास तुम्ही केला नाहीत ही तुमची चूक की पक्षाची? ” असाही प्रश्न धनंजय मुंडे यांनी विचारला.

“भाजपने आमच्या पक्षातील नेत्यांवर टीका केली, त्यांची बदनामी केली आणि आता त्यांना पक्षात घेतले.एकनाथ खडसेंवर आरोप झाल्यापासून ते राजीनामा मंजूर होईपर्यंत सोशल मीडियाचा वापर करुन त्यांच्या विरोधात सोशल मीडियावर चित्र उभे केले गेले.

मुख्यमंत्री दर महिन्याला २५ कोटी रुपये सोशल मीडियावर खर्च करत आहेत.” असाही आरोप धनंजय मुंडे यांनी केला. हे आरोप धनंजय मुंडे यांनी एका खासगी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post