असा शोधला ‘विक्रम’चा पत्ता


वेब टीम : बेंगळुरू
चांद्रयान-२ मधील विक्रमचे हार्ड लँडिंग नेमके कशामुळे झाले? ती कारण शोधून काढण्याचे प्रयत्न इस्रोकडून सुरु आहेत.

ऑर्बिटरने विक्रमच्या लँडिंगच्या जागेचे फोटो पाठवले असून त्याचे विश्लेषण सुरु आहे. इस्रोच्या नियंत्रण कक्षाचा लँडरशी अजूनही संपर्क प्रस्थापित होऊ शकलेला नाही. पुढचे १४ दिवस हाच प्रयत्न केला जाणार आहे.

हा फोटो ऑर्बिटरने शनिवारीच पाठवला होता. पण फोटोत दिसणारी ती वस्तू विक्रम लँडरच आहे याची आम्हाला खातरजमा करायची होती. लँडिंगच्या जागेचे ठराविक अक्षांश आणि रेखांशावरुन काढलेले जुने फोटो आम्ही तपासले.

 त्यावेळी जुन्या फोटोंमध्ये तिथे काहीही दिसत नव्हते. पण नव्या फोटोमध्ये वस्तू स्पष्ट दिसत होती. त्यावरुन तो विक्रम लँडरच असल्याचा आम्ही निष्कर्ष काढला असे इस्रोच्या एका वैज्ञानिकाने सांगितले.

विक्रमने चंद्रावर हार्ड लँडिंग केले असले तरी विक्रम लँडरचे काहीही नुकसान झाले नाही. हा संपूर्ण लँडर एकसंध असून त्याचे तुकडे झालेले नाहीत.

फक्त हा लँडर एकाबाजूला झुकलेला आहे. ही माहिती चंद्राच्या कक्षेत फिरत असलेल्या ऑर्बिटरने पाठवलेला फोटो आणि अन्य डेटाच्या विश्लेषणावरुन समोर आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post