भाजपचे दोन युवा नेते भिडले; मुलाखतीत राडा


वेब टीम : अहमदनगर
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून इच्छुक असणाऱ्यांंच्या  नगर जिल्ह्यातील मुलाखतीवेळी आजी-माजी नगरसेविका मुलांमध्येच वादावादी होऊन हाणामारी झाल्याची घटना बुधवार (दि.४) घडली.

तुम्ही कुणासाठी आलात? या प्रश्नावरून हा वाद झाला असल्याची चर्चा होती.
दरम्यान, असं काही घडलेच नाही, किरकोळ विषय होता, असे म्हणत यावर पडदा घातला जात आहे.

तर हाणामारी नंतर दोघांच्याही कार्यकर्ते, समर्थकांनी मुलाखतीच्या ठिकाणी गर्दी केल्याचे सांगण्यात येत आहे.

 जिल्ह्यातील सर्व विधानसभेतील इच्छुकांनी मुलाखती साठी बुधवारी सकाळी १० वाजल्यापासून गर्दी केली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post