वेब टीम : दिल्ली नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वंशाचे अर्थतज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेट...
वेब टीम : दिल्ली
नोबेल पारितोषिक विजेते भारतीय वंशाचे अर्थतज्ञ अभिजीत बॅनर्जी यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली.
या भेटीनंतर ‘पंतप्रधान मोदी यांनी मला माध्यमांपासून सावध रहायला सांगितलंय.
माध्यमं तुम्हाला माझ्या विरोधात बोलायला भाग पाडेल, असं त्यांनी हसत हसत सांगितलं,’ अशी माहिती बॅनर्जी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
या वर्षीचा अर्थशास्त्रातील नोबेल बॅनर्जी यांना जाहीर झाला आहे. बॅनर्जी यांनी अर्थव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली होती.
भाजपच्या काही मंत्र्यांनी त्यांच्यावर टीकाही केली होती. साहजिकच माध्यमांनी त्यांना आर्थिक मंदीबाबत प्रश्न विचारले.
ते म्हणाले,’पंतप्रधानांनी माध्यमं मला ‘अँटी-मोदी’ गोष्टी बोलण्यास कसं भाग पाडेल याबाबत विनोद करत संभाषणाला सुरुवात केली.
त्यांनी मला माध्यमांपासून सावध राहण्याचा सल्लाही हसत हसत दिला.’ असं बॅनर्जी भेटीबाबत म्हणाले.
‘पंतप्रधान टीव्ही बघतात, त्यांचे तुमच्याकडेही लक्ष आहे. त्यांना माहितीये तुम्ही काय करण्याच्या प्रयत्नात आहात,’ असं बॅनर्जी पत्रकारांना उद्देशून म्हणाले.
COMMENTS