नगरच्या वकीलासह सहकाऱ्याची नेवाशात कुऱ्हाडीने वार करून हत्या


वेब टीम : अहमदनगर
जिल्हा न्यायालयातील अ‍ॅड. संभाजी ताके व त्यांच्या बरोबर असणार्‍या एका सहकार्याची नेवासा तालुक्यातील जेऊर हौबती येथे कुर्‍हाडीने हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आली आहे. बुधवारी (दि.2) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.


 अ‍ॅड. ताके हे पत्नी व दोन मुलांसह भिंगारजवळील असणार्‍या नगर तालुक्यातील सौरभनगर कॉलनीत राहातात. अ‍ॅड. ताके यांचे जेऊर हौबती या गावाचे रहिवाशी होते.

ते बुधवारी (दि.2) गावाकडे कामानिमित्त गेले असता, त्यांच्या जमिनीवरून भांडणे झाली. ते प्रकरण नेवासा न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे. अ‍ॅड. ताकेंबरोबर असणारे त्याचे सहकारी ओळख अजून पडलेली नाही.

कुर्‍हाडीने हल्ला केला या घटनास्थळी मोठी गाडी आढळून आली आहे, असे पोलिसांकडून सांगण्यात येते. घटनास्थळाचा पंचनामा नेवासा पोलिसांनी केला आहे.

अ‍ॅड. ताके यांच्या खूनाची माहिती नगर शहरासह भिंगारमध्ये पसरल्याने मोठी खळबळ उडाली आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post