वेब टीम : अनंतनाग जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. ही चकमक मंगळवारी रात्री उशिरा सुरू...
वेब टीम : अनंतनाग
जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले.
ही चकमक मंगळवारी रात्री उशिरा सुरू झाली होती. सुरक्षा दलाच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना घेरले होते.
या चकमकीत हिजबुल मुजाहिद्दीनचा एक दहशतवादी ठार झाल्याचे समजते.
ही चकमक अनंतनागमधील बिजबेहरा परिसरात सुरू होती. या ठिकाणी काही दहशतवादी लपल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
त्यानंतर त्यांनी मंगळवारी रात्री शोधमोहीम सुरू केली. या दरम्यान दहशतवाद्यांनी पोलिसांवर गोळीबार सुरू केला. त्याला सुरक्षा दलाच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले.
आज सकाळी अखेर या तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. यामध्ये दहशतवादी संघटना हिजबुल मुजाहिद्दीनचा कमांडर नासीरचा खात्मा समावेश आहे.
COMMENTS