फुटपाथवर झोपलेल्या सात जणांना बसने चिरडले


वेब टीम : बुलंदशहर
उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात बसने चिरडल्याने सात जण ठार झाले.

मृतांमध्ये चार महिला आणि तीन मुलांचा समावेश आहे.पीडित देवदर्शनाहून परतत होते.

यावेळी रस्त्याच्या शेजारी फुटपाथवर ते झोपले होते. यावेळी एका खासगी बसने त्यांना चिरडले.

या बसमध्ये वैष्णोदेवी येथून परतणारे भाविक प्रवास करत होते.ही घटना बुलंदशहरातील गंगाघाट येथे घडली.

पीडित मुलाचे उत्तर प्रदेशातीलच आहेत. गंगा नदीत स्नान केल्यानंतर नरोरा घाट येथून ते पुन्हा घऱी परतत होते.

यावेळी ही दुर्घटना घडली. अपघातानंतर आरोपी चालक बेपत्ता आहे.

पोलिसांनी सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले असून चौकशी सुरू आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post