राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; शिवसेनेची राज्यपालांकडे मागणी


वेब टीम : मुंबई
राज्यातील वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शिवसेनेच्यावतीने करण्यात आली. 

शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या आमदारांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची गुरुवारी भेट घेतली. यावेळी त्यांनी ही मागणी केली.

राज्यात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत राज्यपाल हे राज्याचे पालक असून संकटात सापडलेल्या शेतकरी आणि मच्छीमार बांधवांना तात्काळ मदत व्हावी म्हणून तातडीने पावले उचलण्याची गरज असल्याचे आदित्य ठाकरे म्हणाले. 

आम्ही सर्व ६३ आमदारांनी राज्यापालांची भेट घेतली. त्यासाठी आम्ही राज्यपालांशी चर्चा केली. पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे व्हायला हवे. 

केंद्राकडून मदत मिळायला हवी. राज्यातील सर्व संबंधित यंत्रणा सक्रिय व्हायला हव्यात. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करून त्याप्रमाणे निधी दिला गेला पाहिजे.

अशाप्रकारची विनंती आम्ही राज्यपालांकडे केली आहे. यावर, राज्यपालांनीही मदत करण्याचे आश्वासन दिले असल्याचे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post