शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड


वेब टीम : मुंबई
सेना-भाजपमधील सत्तासंघर्ष कधी संपणार याकडे सगळ्या राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी एकनाथ शिंदे यांची निवड करण्यात आली आहे.

सेनेचे नवनिर्वाचित आमदार व युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी पक्षाच्या बैठकीत एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला.

त्यानंतर शिंदे यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. मावळत्या विधानसभेत शिंदेच सेनेचे गटनेते होते.

यासोबतच सुनील प्रभू यांची विधानसभेतील शिवसेनेच्या पक्ष प्रतोदपदी निवड करण्यात आली.

बैठकीत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यात निर्माण झालेल्या राजकीय परिस्थितीची माहिती सर्व आमदारांना दिली.

तसेच भाजप आणि शिवसेनेत जे काही पूर्वीपासून ठरले आहे, ते सगळे मिळेल असेही उद्धव ठाकरे यांनी बैठकीत सांगितल्याची माहिती मनोहर जोशी यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post