श्रीनगरमध्ये ग्रेनेड हल्ल्यात सात जखमी


वेब टीम : श्रीनगर
जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा ग्रेनेड हल्ला केला. हे ग्रेनेड हरी सिंह हाय रस्त्यावर फेकण्यात आले.या हल्ल्यात सात जण जखमी झाले असून तिघांची प्रकृती गंभीर आहे.

सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील मानल्या जाणाऱ्या हरी सिंह मार्गावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड हल्ला केला असून त्यात ५ जण जखमी झाले.

सर्व जखमींना श्रीनगरमधील एसएमएचएस रुग्णालयात दाखल केले. या हल्ल्यानंतर लष्कर, पोलीस आणि सीआरपीएफने संयुक्तपणे शोधमोहीम हाती घेतली.

हरी सिंह मार्गावर सुरक्षादलाची चौकी असून तिथून काही अंतरावरच असलेल्या बाजारात दहशतवाद्यांनी ग्रेनेड स्फोट घडवले. त्यानंतर दहशतवादी तिथून पसार झाले.

स्फोटांनी परिसरात एकच दहशत पसरली. या हल्ल्यात पाचजण जखमी झाले असून काही वाहनांचे नुकसान झाले आहे.

या हल्ल्यानंतर संपूर्ण परिसर सील केला असून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू आहे. श्रीनगरच्या विविध भागांत हाय ऍलर्ट जारी केला असून लोकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडावे असे आवाहन प्रशासनाने केले.

हरी सिंह मार्गावर दहशतवाद्यांनी ग्रेनेड फेकल्यानंतर मार्केटबाहेरच्या रस्त्यावर त्याचा स्फोट झाला. तिथे पार्क केलेल्या काही गाड्यांच्या काचा फुटून नुकसान झाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post