फॉर्म्युला वगैरे काही नाही; पुढचे पाच वर्षे मीच मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस


वेब टीम : मुंबई
फॉर्म्युला वगैरे काही नाही, पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री राहणार असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

 पुढच्या आठवड्यात शपथविधी अपेक्षित आहे असंही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

 पत्रकारांना आज दिवाळी फराळानिमित्त वर्षावर बोलवण्यात आलं होतं.

त्यावेळीच देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केलं आहे.

मातोश्रीबाहेर आणि वरळीत आदित्य ठाकरे यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनरही झळकले.

त्यामुळे आता शिवसेना आणि भाजपा यांच्यात मुख्यमंत्रीपदावरुन काय ठरतं हे पाहणं महत्त्वाचं असतानाच देवेंद्र फडणवीस यांनी अनौपचारिक गप्पांमध्ये पुढील पाच वर्षांसाठी मीच मुख्यमंत्री होणार  असं म्हटलं आहे.

एवढंच नाही तर ५०-५० चा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नाही असंही देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post