भारताच्या बोफोर्स तोफांचे पाकिस्तानमध्ये तांडव; ५० दहशतवादी, सात एसएसजी कमांडो ठार


वेब टीम : काश्मीर
भारताने सोमवारी पुन्हा एकदा पाकव्याप्त काश्मीर मधील दहशतवादी तळांवर कारवाई केली. भारताने सात दहशतवादी तळांना लक्ष्य केले.

या कारवाईत ५० दहशतवादी ठार झाल्याचा दावा आहे. ही माहिती लष्करातील वरिष्ठ सूत्रांनी एका वृत्तपत्राला दिली.

ही कारवाई पाकिस्तानच्या बॅट कमांडो फोर्सच्या सात एसएसजी कमांडोंनी तंगधार सेक्टरमध्ये घुसखोरीचा प्रयत्न केल्यानंतर झाली.

नियंत्रण रेषेवर पाकिस्तानच्या हद्दीत या कमांडोंचे मृतदेह आहेत. पाकिस्तानने अजूनही या मृतदेहांवर दावा केलेला नाही. नियंत्रण रेषेवर भारताच्या बोफोर्स तोफांचे अक्षरक्ष: तांडव सुरु आहे.

बोफोर्स तोफांमधून जवळपास ३ हजार तोफगोळे डागल्याचा सूत्रांचा दावा आहे. सात पैकी पीओकेमध्ये ३० किलोमीटर आत असणाऱ्या दोन तळांवर अचूक प्रहार केला.

भारताच्या तोफ गोळयांच्या वर्षावामध्ये पीओकेमधील नीलम-झेलम हायड्रोपावर प्रकल्पाच्या तीन नंबर गेटचेही नुकसान झाले आहे.

भारतीय लष्कराने रविवारी सुद्धा पीओकेमधील चार दहशतवादी तळ उध्वस्त केले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post