उदयनराजे पावसाचा राजकीय बळी : जितेंद्र आव्हाड


वेब टीम : मुंबई
राज्याच्या विधानसभा निवडणुकांबरोबरच सातारा लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूकही पार पडली.

विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना शह देत राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी पोटनिवडणूकीत मोठ्या मतफरकाने बाजी मारली.

राष्ट्रवादीतून भाजपमध्ये गेलेल्या उदयनराजेंना राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत लक्ष्य केले आहे.


यंदाच्या लांबलेल्या पावसाळ्याने महाराष्ट्रात २७ बळी घेतले. साताऱ्यात एक राजकीय बळी घेतला. त्याचं नाव #उदयनराजे_भोसले.’ असं ट्विट आव्हाड यांनी केलं आहे.

कालच्या निकालानंतर प्रतिक्रिया देतानाच त्यांनी ‘लोकांनी उदयनराजेंना जो धडा शिकवला आहे तो महत्वाचा आहे.

मला माझ्या विजयापेक्षा उदयनराजेंच्या पराभवाचाच अधिक आनंद झाला आहे. उदयनराजेंनी शरद पवारांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला.

त्यानंतर त्यांना लोकांनी धडा शिकवला आहे. दहा वर्षांपूर्वी शरद पवारांनी संपूर्ण सातारा जिल्ह्याचा विरोध पत्कारुन उदयनराजेंना उमेदवारी दिली होती.

आम्ही महाराजांच्या विचारांवर चालतो, महाराजांनी आम्हाला कधी गद्दारी शिकवली नव्हती,’ असं म्हणत उदयनराजेंवर टीका केली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post