जस्टिन बिबरने केले दुसरे लग्न; कोण आहे त्याची बायको? वाचा


वेब टीम : न्यूयॉर्क
पॉप संगीत क्षेत्रातील पॉप स्टार जस्टिन बिबर सध्या विशेष आनंदात आहे. जस्टिनने सोशल मीडियावर केलेली पोस्ट पाहता त्याच्या आनंदाचा अंदाज बांधणे शक्य होत आहे.

त्याच्या आनंदास कारण ठरतय ते म्हणजे त्याने पुन्हा केलेलं लग्न. जस्टिनने मॉडेल हिली बाल्डविनसोबत पुन्हा एकदा विवाहबद्ध झाला आहे. या दुसऱ्या लग्नाचे फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केले.

या दोघांची एंगेजमेंट अ‍ॅनिव्हर्सरी असल्यामुळे त्यांनी पुन्हा एकदा लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दुसऱ्यांदा झालेल्या लग्नसोहळ्यामध्ये १५४ नातेवाईक आणि जवळचे मित्र-मैत्रिणी उपस्थित होते.

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसापासून या दोघांच्या नात्यात दुरावा आल्याच्या बऱ्याच चर्चा रंगल्या होत्या.मात्र पुन्हा लग्न करुन या दोघांनी या चर्चांना पूर्णविराम दिला.

या एंगेजमेंट अ‍ॅनिव्हर्सरी निमित्त केलेल्या लग्नात हिलीने पांढऱ्या रंगाचा वेडिंग गाऊन तर जस्टिन ब्लॅक टक्सीडोमध्ये दिसत आहे.जस्टिनने २०१८ मध्ये हिलीसोबत लग्न केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post