वेब टीम : मुंबई (ताज्या अपडेट साठी हे पेज रिफ्रेश करत राहा) 288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या...
वेब टीम : मुंबई
(ताज्या अपडेट साठी हे पेज रिफ्रेश करत राहा)
288 विधानसभा मतदारसंघांच्या सार्वत्रिक आणि सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे.
राज्यातील 288 मतदारसंघातील 3237 उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला हाती येणार आहे. आज, 24 रोजी होणाऱ्या मतमोजणीची सर्व तयारी पूर्ण झाली असून यासाठी पंचवीस हजारांहून अधिक अधिकारी-कर्मचाऱ्यांची मतमोजणीसाठी नेमणूक करण्यात आली आहे.
मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होईल. दरम्यान सर्व मतमोजणी कर्मचाऱ्यांना मतमोजणीचे 2 वेळा प्रशिक्षण देण्यात आलेले आहे. 269 ठिकाणी 288 केंद्रावर ही मतमोजणी होणार आहे.
COMMENTS