देश लुटणार्‍यांना तुरुंगात पाठवणारच : मोदी


वेब टीम : पुणे
देशातील जनतेच्या पैशांची लूट करणार्‍यांना मागील पाच वर्षांमध्ये तुरुंगाच्या दरवाजापर्यंत पोहचवले; आता तुरुंगात टाकण्याचे काम सुरू आहे.

आपण हे पाहातच आहात, यापुढेही हे सुरूच राहणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले.

विधानसभा निवडणुकांसाठी पंतप्रधान मोदी हे प्रचारात उतरले असून, पुण्यातील उमेदवारांसाठी स.प. महाविद्यालयाच्या मैदानात काल त्यांची सभा झाली.

यावेळी मोदी म्हणाले, देशातील जनतेच्या पैशाची लूट करणार्‍यांची मागील पाच वर्षांत चौकशी करून त्यांना तुरुंगाच्या दरवाजापर्यंत पोहचवले.

आता एक एकाला तुरुंगात टाकण्याचे काम सुरू आहे, असे सांगत त्यांनी अप्रत्यक्षरित्या काँग्रेसवर निशाणा साधला.

देशातील नागरिकांची पै-पै वसूल होईपर्यंत त्यांना सोडले जाणार नाही. देशाला ज्यांनी लुटले त्याचा हिशोब द्यावाच लागणार?असल्याचे मोदी यावेळी म्हणाले.

देशामध्ये मोठ्या प्रमाणात परकीय गुंतवणूक येत आहे. मागील पाच वर्षांत परदेशी गुंतवणुकीच्या प्रमाणात पाचपट वाढ झाली आहे.

जगभरातील अनेक देश भारतात गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था ५ ट्रिलीयन डॉलरपर्यंत निश्चित जाणार?आहे. काही लोकांना हे शक्य वाटत नाही. विनाकारण टीकेचा भडीमार करण्यात येत?आहे.

देशातील युवकांच्या सामर्थ्यावर आणि कर्तृत्वावर मला विश्वास आहे. त्यामुळे आपण हे लक्ष निश्चितच पूर्ण करू. अर्थव्यवस्था वाढल्यास गरिबी दूर होईल आणि मध्यवर्गीयांचा विकास हाईल, असेही मोदी म्हणाले.

जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० हटविण्याचा ऐतिहासिक निर्णय आम्ही घेतला.आजही त्याची चर्चा आहे. एक देश-एक संविधान असताना गेल्या ७० वर्षांत जे घडले नाही ते आम्ही करून दाखवले आहे.

१३० कोटी भारतीयांना संघटित करण्याचे काम केले. जनादेशामुळे आम्ही हा निर्णय घेऊ शकलो. आज भारताकडे कोणताही देश डोळे वटारून पाहू शकत नाही.हा नवा भारत आहे.

२१ व्या शतकात जगभर बदललेली स्थिती आणि परिस्थिती आहे. आपल्या काही बदलांचा आणि परिस्थितीचा यासाठी स्वीकार करावा लागणार आहे.

नवीन भारतासाठी सर्वांनी तयार राहा. काही लोक निराशा पसरवण्याचा प्रयत्न करीत आहेत. मात्र, त्याचा काहीच उपयोग होणार नसल्याचे मोदी म्हणाले.

देश विकासाच्या मार्गावर आहे. देशातील अनेक शहरे जोडली जात?आहेत. पुणे ते पंढरपूर पालखी मार्गासाठी वेगाने काम सुरू आहे. तेजस आणि वंदे भारत ही एक्स्प्रेस देशात काही ठिकाणी सुरू करण्यात?आली?आहे.

पुणेकरांना याचा लाभ लवकरच मिळणार आहे. रस्ते वाहतुकीबरोबर हवाई वाहतुकीला देखील चालना देण्यात आली.

राज्यातील ९ शहरे उड्डाण योजनेमध्ये घेण्यात?आली आहेत. हवाई चप्पल घालणारा नागरिकदेखील?आता हवाई प्रवास करू लागला असल्याचे मोदी म्हणाले.

गेल्या पाच वर्षांत पुण्याचा विकास झपाट्याने झाला आहे. मेट्रोचे काम सुरू आहे. यामुळे शहराच्या वाहतुकीचा प्रश्न मिटला आहे. देशात पायाभूत सुविधांवर १०० लाख कोटी खर्च करण्यात येणार आहे , याचा लाभ पुण्याला होईल.

या प्रसंगी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, अमर साबळे, महापौर सौ. मुक्ता टिळक यांच्यासह मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आणि पदाधिकारी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post