शंकरराव गडाख यांना राष्ट्रवादी करणार पुरस्कृत?


वेब टीम : अहमदनगर
नेवासा विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसला तोडीस तोड उमेदवार देता आलेला नाही. त्यामुळे भाजप विरोधात मतांचे विभाजन टाळण्यासाठी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीने उभे राहिलेल्या शंकराव गडाख यांना पुरस्कृत करण्यात येण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने वरिष्ठ पातळीवर प्रयत्न सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

HTTPS://mr.dnalive24.com

भाजपचे आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्याविरोधात क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या वतीने माजी आमदार शंकरराव गडाख यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. राष्ट्रवादीकडून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विठ्ठलराव लंघे व माजी आमदार पांडुरंग अभंग यांचे नाव आघाडीवर आहे. मात्र राष्ट्रवादीने या मतदारसंघात उमेदवार दिल्यास त्याचा फायदा भाजप उमेदवाराला होऊ शकतो. त्यामुळे क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्यावतीने उभ्या असलेल्या शंकरराव गडाख यांना पुरस्कृत करण्याची राष्ट्रवादी करणार आहे.

www.dnalive24.com

राष्ट्रवादीने अशी खेळी केल्यास भाजप उमेदवाराला निवडणूक जड जाणार आहे. याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार व माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्यात चर्चा झाल्याची माहितीही सूत्रांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post