पारनेरमध्ये तिसऱ्या भिडूने वाढविले ना. विजय औटींचे टेन्शन


वेब टीम : अहमदनगर
पारनेर विधानसभा मतदारसंघात नगर तालुक्यातील समाविष्ट गावांचा मोठा प्रभाव राहिलेला आहे. या तालुक्यातील महाआघाडीतर्फे शिवसेनेचे जि. प.सदस्य संदेश कार्ले (नगर) व माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष सुजित झावरे (पारनेर) यांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले.

यामुळे विधानसभेचे उपाध्यक्ष व शिवसेनेचे उमेदवार विजय औटी अडचणीत येण्याची शक्यता आहे.

पारनेर- नगर मतदारसंघात महाघाडीचा तिसरा भिडू मैदानात उतरल्याने लढाई निर्णायक वळणावर पोहोचली आहे.

पारनेर मतदारसंघातील नवीन राजकीय समीकरणांमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. शिवसेनेकडे उमेदवारी मागूनही न मिळाल्याने कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर जिल्हा परिषद सदस्य संदेश् कार्ले यांनी पारनेर मतदारसंघात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांच्यासह नगर तालूक्यातील काँग्रेस , राष्ट्रवादी , शिवसेना, भाजप महाआघाडीचे सर्व जिल्हा परिषद व पंचायत समिती पदाधिकारी आणि पारनेरमधील नेते उपस्थित होते.

शिवसेनेचे औटी यांच्यासाठी ही मोठी डोकेदुखी ठरणार आहे . नगर तालुक्यातील ४३ गावे आणि ९० हजार ५०० मतदान पारनेर विधानसभा मतदारसंघात येते. आत्तापर्यन्त नगर तालुक्यातील जिल्हा परिषद सदस्य प्रताप शेळके, माधवराव लामखडे यांनी या मतदारसंघातून निवडणूक लढविली, मात्र त्यांना त्यात यश आले नाही.

त्यावेळी नगर तालूक्यात सर्व पक्षीय आघाडी नव्हती. शेळके किंवा लामखडे हे सर्व पक्षीय आघाडीचे म्हणून उमेदवार नव्हते. परंतु आता कार्ले यांच्याबरोबर नगर तालुक्यातील राष्ट्रवादीचे माधवराव लामखडे , शिवसेनेचे शरद झोडगे, काँग्रेसचे बाळासाहेब हराळ, पंचायत समितीचे सभापती रामदास भोर , उपसभापती प्रवीण कोकाटे, पंचायत समिती सदस्य व्ही.डी. काळे, गुलाब शिंदे, संदीप गुंड, विश्वास जाधव यांसह अनेक प्रमुख बरोबर आहेत.


पारनेर तालुक्यातील सुजित झावरे यांचीही उपस्थिती होती. यामुळे पारनेर नगर मतदारसंघात नवीन राजकीय घडामोडींला वेग आला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post