पावसाने चुकवला पुणेकरांच्या काळजाचा ठोका


वेब टीम : पुणे
तासभर झालेल्या धुव्वादार पावसामुळे पुन्हा एकदा पुणेकरांच्या काळजाचा ठोका चुकवला.

रस्त्यांना आलेले नाल्याचे स्वरूप, ठिकठिकाणी कोसळलेली झाडे, पाण्यात अडकलेली वाहने आणि काही भागात सोसायट्यांमध्ये पाणी शिरल्याने पुणेकरांना नुकत्याच झालेल्या ढगफुटीची आठवण झाली.

पावसाचा इतका वेग होता की सुरूवातीच्या अवघ्या 15 ते 20 मिनिटांत शहरातील अनेक रस्ते जलमय झाले.

चौकाचौकांत प्रचंड पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली. मध्य भागातील अनेक पार्किंगमध्येही पाणी साठल्याने वाहने काढणेही कठीण झाले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post