कर्जत-जामखेडमध्ये आत्ताच दादागिरीला सुरुवात; पुढची तर कल्पनाच नको: राम शिंदे


वेब टीम : अहमदनगर
विरोधकांच्या पायाखालची जमीन सरकली आहे. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी आमच्या भाजप तालुकाध्यक्षांवर हल्ला केला. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना मारहाण केली.

त्यांची आत्तापासूनच दादागिरी सुरू झालीय. त्यामुळे पुढे काय होईल याची कल्पना न केलेली बरी, अशा शब्दात कर्जत जामखेडचे भाजपचे उमेदवार राम शिंदे यांनी विरोधकांवर हल्ला चढविला आहे.

ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. खर्ड्यातल्या सभेत आम्ही यांना योग्य उत्तर देऊ, असं अजित पवार म्हणाले. मात्र, आम्ही जर काही प्रश्नच निर्माण केले नसतील, तर ते आम्हाला काय उत्तर देणार? असा टोला त्यांनी लगावला.

 विरोधक मतदारसंघ फिरले तर त्यांना विकास कामे दिसतील. पाच वर्षात अनेक कामे झाली आहेत. उर्वरित कामे यंदाच्या पाच वर्षात होतील. त्यामुळे काळजीचं कारण नाही.

ही निवडणूक जनतेने हातात घेतली आहे. त्यामुळे माझा विजय निश्चित आहे. विरोधकांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय जनता आता गप्प बसणार नाही, असा विश्वासही राम शिंदे यांनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post