दुसऱ्याच्या शेतात राबून पोराला शिकवलं; राम शिंदेंच्या आईला भावना अनावर


वेब टीम : अहमदनगर
कर्जत-जामखेड मतदारसंघातून भाजप नेते आणि पालकमंत्री राम शिंदे आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. राम शिंदे यांनी वृद्ध आई-वडिलांचा आशीर्वाद घेतला.

मुलाला अतिशय कष्टातून मी शिकवलंय, दुसऱ्याच्या शेतात काम करुन मुलांना लहानाचे मोठे केले, आज त्याला मंत्री म्हणून पाहताना आनंद होतो, अशी प्रतिक्रिया राम शिंदे यांच्या मातोश्रींनी वृत्तवाहिनीशी बोलतांना व्यक्त केली.

 खूप गरीब परिस्थिती होती, आज चांगले दिवस आले आहेत. मुलाला नेहमीच आशीर्वाद आहे, असे त्या म्हणाल्या.

राम शिंदे यांच्याविरोधात राष्ट्रवादीकडून शरद पवारांचे नातू रोहित पवार मैदानात आहेत. रोहित पवारांनी काल अर्ज दाखल केल्यानंतर आज राम शिंदे आपली ताकद दाखवणार आहेत.

राम शिंदे यांचा अर्ज भरण्यासाठी उदयनराजे भोसले, गिरीश महाजन हे दाखल झाले आहेत. राम शिंदे तिसऱ्यांदा आपला अर्ज दाखल करत आहेत.

दरम्यान, घराणेशाही समोर लोकशाहीचा विजय होईल. समोरचा उमेदवार किती मोठा असला तरी केलेल्या कमांच्या जोरावर शिंदेसाहेब निवडून येतील, असा विश्वास राम शिंदेंच्या पत्नी आशा शिंदे यांनी व्यक्त केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post