वेब टीम : पुणे शरद पवार हे कुस्ती संघटनेचे अध्यक्ष होते. मी त्यांच्यात तालमीत तयार झालो आहे. शरद पवार हे पूर्वी पैलवान होते पण आता आम्ह...
वेब टीम : पुणे
शरद पवार हे कुस्ती संघटनेचे अध्यक्ष होते. मी त्यांच्यात तालमीत तयार झालो आहे. शरद पवार हे पूर्वी पैलवान होते पण आता आम्हीच पैलवान आहोत. 2019 ची कुस्तीदेखील आम्हीच जिंकणार आहोत, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला.
वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांच्यावर टीका करताना ते म्हणाले, की ‘‘वंचित बहुजन आघाडी काढून प्रकाश आंबेडकर वंचितांना सत्तेपासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करीत आहेत. वंचितांना सत्तेत आणायचे असेल तर त्यांनी आमच्याबरोबर, पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत आले पाहिजे.
राज ठाकरे यांच्यावरही त्यांनी टीका केली. राज ठाकरे हे विरोधी पक्ष होण्यासाठी मते मागत आहेत मात्र केंद्राप्रमाणेच राज्यातही विरोधी पक्ष होण्यासाठी आवश्यक जागा विरोधकांना मिळणार नाहीत.
राज हे चांगल्या नकला करतात, पण भाषणे ऐकून विकास होत नसतो. बाळासाहेेब ठाकरे यांचे वारसदार आपणच आहोत, हे उद्धव ठाकरेंनी सिद्ध केले आहे.
आम्हाला कोणाशी कुस्ती खेळायची नसली तरी सध्या देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे आणि मी हेच पैलवान आहेत,” असे मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले.
भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी पुण्यात आले असता आठवले बुधवारी (दि. 16) पत्रकारांशी बोलत होते.
COMMENTS