पोलिसांना धक्काबुक्की करून पळालेला राष्ट्रवादीचा 'तो' नगरसेवक जेरबंद


वेब टीम : अहमदनगर
मोहरम व गणेशोत्सवामुळे काही दिवसांसाठी शहरबंदी असताना राष्ट्रवादी काँग्रेसचा नगरसेवक समद वहाब खान पोलिसांना शहरात आढळून आला होता.

नगरसेवक खान याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करत तो पसार झाला होता. या प्रकरणी भिगार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नगरसेवक समद खान हा आज (गुरुवारी) सकाळी मुकुंद नगर परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा लावून त्याला भिंगार पोलिसांनी ताब्यात घेतले

पोलिसांना धक्काबुक्की करून पळून गेल्या प्रकरणी भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला सरकारी कामात अडथळा आणणे, आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला होता.

गणेशोत्सव व मोहरमच्या काळात शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या साडेतीनशेहून अधिक जणांना सहा दिवसांसाठी शहरबंदी करण्यात आली आहे.

शहरबंदी असलेली व्यक्ती शहर सोडून गेली की नाही हे पाहण्यासाठी भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनचे उपनिरीक्षक मंगेश बेंडकोळी, कर्मचारी अजय नगरे हे मुकुंदनगर येथे गेले होते. मुकुंदनगरमधील नगरसेवक खान याच्या घरी पोलिस गेले असता खान घरी नव्हता, इतर सदस्य घरात होते.

त्यांनी नगरसेवक खान हा बाहेरगावी गेला असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्या ठिकाणहून पोलिस दुसरीकडे जात असताना खान याच्या घराशेजारी एक पांढरी कार उभी असल्याचे त्यांना दिसले. त्या कारमध्ये नगरसेवक खान बसला होता. पोलिसांनी त्याला कारमधून खाली उतरण्यास सांगितल्यानंतर तो कारमधून खाली उतरला. त्यानंतर तो पळून जाऊ लागला. पोलिस कर्मचारी नगरे यांनी पाठलाग करून खान याला पकडले. परंतु खान हा नगरे यांना धक्काबुक्की करून एका व्यक्तीच्या मदतीने दुचाकीवरून पळून गेला. त्यानंतर सोमवारी रात्री भिंगार कॅम्प पोलिस स्टेशनला पोलिस कर्मचारी नगरे यांच्या फिर्यादीवरून नगरसेवक समद खान व अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला होता. भिंगार पोलीस ठाण्याचे सपोनि प्रवीण पाटील, राजेंद्र गायकवाड, पोहेकॉ. वराट, पोकॉ. राजेंद्र सुद्रीक यांनी अटक केली

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post