उदयनराजेंचा पराभव म्हणजे आमचा पराभव : संभाजीराजे


वेब टीम : सातारा
सातारा लोकसभा पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीला रामराम करत खासदारकीचा राजीनामा देणाऱ्या उदयनराजेंना पराभवाचा झटका बसला. 

राष्ट्रवादीच्या श्रीनिवास पाटील यांनी त्यांचा एक लाखांहून अधिक मताधिक्याने पराभव केला. या पराभवानंतर जितेंद्र आव्हाड, संजय राऊत यांनी उदयनराजेंवर टीका केली. 

आता कोल्हापूरचे छत्रपती खासदार संभाजीराजे यांनीही या पराभवावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

‘छत्रपती उदयनराजे यांचा पराभव म्हणजे आमचा पराभव आहे. त्यांच्या पराभवाचं आम्हाला मनापासून दु:ख आहे. 

मात्र सुख दु:ख पाहण्याची छत्रपती घराण्याची सवय आहे, आजचा पराजय हा उद्याचा विजय कसा असेल याचा विचार छत्रपती उदयनराजे नक्की करत असतील.

 पद हा फक्त एक भाग आहे, मात्र छत्रपतींची पदवी ही महत्वाची असते, रयतेची सेवा करणे ही छत्रपती घराण्याची परंपरा आहे’, अशी प्रतिक्रिया संभाजीराजे यांनी सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post