आम्ही सत्तेसाठी लोकशाहीची हत्या करणार नाही : संजय राऊत


वेब टीम : मुंबई
शिवसेना युती धर्माचं पालन करत आहे. जर कुणी युती धर्म पाळत नसेल तर ती त्यांची चूक आहे.

आमच्याकडे इतर पर्यायही उपलब्ध आहेत. आम्ही योग्य नीतीवर काम करतो. सत्तेसाठी आम्ही भुकेले नाहीत.

आमच्याकडे इतरही पर्याय उपलब्ध आहेत, मात्र सत्तेसाठी लोकशाहीची हत्या आम्ही करणार नाही, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

राऊत म्हणाले की, महाराष्ट्रात कुणी दुष्यंत नाहीस ज्याचे वडील जेलमध्ये आहेत. याठिकाणी नीती, धर्म आणि सत्याच्या गोष्टी आम्ही करतो.

येथे शरद पवार आहेत, ज्यांनी भाजपविरोधात उभं राहून निवडणूक लढवली.

याठिकाणी काँग्रेस आहे ज्यांच्याकडे एक आकडा आहे, जो कधीही भाजपसोबत जाणार नाही. महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण गुंतागुंतीचं बनलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post